"सोमेश्वर" ला मोकाट फिरणाऱ्यांवर करवाई; ७ दुचाकी वाहणे ताब्यात घेत ७ हजार ५००₹ चा दंड केला वसूल: API सोमनाथ लांडे
"सोमेश्वर" ला मोकाट फिरणाऱ्यांवर करवाई; ७ दुचाकी वाहणे ताब्यात घेत ७ हजार ५००₹ चा दंड केला वसूल: API सोमनाथ लांडे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर ठाणे अंकित करंजेपुल दुरक्षेत्र येथे रस्त्यावर मोकाट विनाकारण फिरणाऱ्या वाहन व चारचाकी यांच्या वर कडक कारवाई सोमवार दि १७ रोजी करंजेपुल दुरक्षेत्र समोर करण्यात आली, सकाळपासूनच ही करवाई सुरू असल्याने सोमेश्वरनगर मधील काही मोकाट फिरणाऱ्यां वर मात्र चांगलीच धडक बसल्याने कोण्ही विनाकारण फिरताना दिसले नाही , तर काही ७ दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली असून ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
सध्या कोरोण्याची दुसरी लाट व तालुक्यातील कोरोना चा वाढता संसर्ग पाहता शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोणीही घराबाहेर पडू नये असे सांगत असताना देखील काही बहाद्दर सोमेश्वरनगर परिसरात विनामास्क व मोकाट फिरताना दिसत आहे .अश्या नागरिकांना ५००रु दंड तर त्यांची वाहने जप्त केल्यास लॉगडाऊन संपेपर्यंत ही करवाई असणार असल्याचे एपीआय लांडे यांनी बोलताना सांगितले.
शासनाने दिलेल्या एक जून पर्यंतचे लॉकडाऊन संपेपर्यंत नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, विनाकारण फिरताना दिसल्यास त्या वाहनांच्या वर कारवाई करत त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात येणार असून यापुढेही अशीच कारवाई सुरुच राहणार असल्याचे वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगत आव्हानही केले आहे.
करंजेपुल दूरक्षेत्र सुरू असलेल्या विनाकारण फिरणाऱ्यां नागरिक व वाहनावर कारवाई दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दुरक्षेत्र चे पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस कर्मचारी नितीन बोराटे, रमेश नागटीळक ,गौतम लोकरे, महादेव साळुंखे , तसेच होमगार्ड सुनील बामणे, गौरव म्हेत्रे,आसिफ शेख, यांनी या कारवाईत दरम्यान उपस्थित होते.
Comments
Post a Comment