महाराष्ट्रातील 15 दिवसांनी वाढवला लॉगडाऊन तर जिल्हाबंदी 10 जूननंतर उठण्याची शक्यता
महाराष्ट्रातील 15 दिवसांनी वाढवला लॉगडाऊन तर जिल्हाबंदी 10 जूननंतर उठण्याची शक्यता
जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते.
कोरोनाची रुग्णसंख्या बघता 10 जूनपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी अशी चर्चा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती.
पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Comments
Post a Comment