Posts

Showing posts from June, 2025

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर...

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर... मुख्य संपादक विनोद गोलांडे  बारामती - बालगंधर्व परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिन दि.२४,२५ व २६ जून २०२५ रोजी होणाऱ्या महोत्सवानिमित्त  रयत शिक्षण संस्थेचे शारदा शैक्षणिक संकुल राहाता जि- अहिल्यानगर या संकुलातील मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय, प्रभावी प्राध्यापक व साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर  या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-  प्रा. हनुमंत माने यांना यंदाच्या वर्षाचा बालगंधर्व परिवाराच्या वतीने "प्रेरणादायी भाषण कला प्रशिक्षक व प्रभावी वक्ता"  या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा "विशेष सन्मान" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार आहे.   प्रा. हनुमंत माने यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मराठी भाषेचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे. व संभाषण कौशल्य विकसित व्हावे. यासाठी संभाषण कला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विशेष प्रयत्...