Posts

Showing posts from November, 2024

Baramati प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे बारामतीत होणार आगमन

Image
Baramati प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे बारामतीत होणार आगमन बारामती : प. पू. जगद्‌गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रीक्षेत्र काशी यांचे शुक्रवार दिनांक २२/११/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बारामती नगरीत आगमन होत आहे. शहरातील वीरशैव मंगल कार्यालय भिगवण रोड, बारामती. या ठिकाणी ते येणार आहेत. दीपावलीच्यापर्वात काशी महास्वामीजींचे दर्शन व आशीर्वचन म्हणजे खऱ्या अर्थाने बारामतीकरांची दिवाळी साजरी होणार आहे. या मंगलप्रसंगी सर्व समाज बंधू आणि भगिनींनी सदभक्तांनी उपस्थितीत राहून धर्मसभा, आशीर्वचन व दर्शन या पर्वणीचा लाभ अवश्य घ्यावा असे अहवान वीरशैव लिंगायत समाज बारामती यांनी केले आहे.