Posts

Showing posts from July, 2024

पुणे विभागाचे आयसीटी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन, मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न...

Image
पुणे विभागाचे आयसीटी संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन, मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न... सोमेश्वरनगर - महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या वतीने पुणे,विभागातील सांगली, सातारा,सोलापूर, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात संगणक प्रशिक्षकांनाप्रशिक्षण देण्यासाठी आझम कॅम्पसपुणे येथे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा शनिवारी संपन्न झाली. पुणे  व सांगली जिल्हा समन्वयक संतोष गोलांडे ,अक्षय वढणकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्धाटन हिना कौसर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी पुणे विभाग प्रमुख प्रफुल हिवाळे, जिल्हा व्यवस्थापक तसेच विभागातील सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, तसेच संगणक प्रशिक्षक उपस्थित होते. महाराष्ट्रातील २२७३ शाळांमधील पुणे विभागातील २००पेक्षा जास्त प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे सांगली जिल्ह्यात आयसीटी प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संगणकज्ञान व्हावे, या उद्देशातून समग्रशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोग शाळा व संगणक प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.जुलै महिन...