Posts

Showing posts from March, 2024

बारामती ! न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

Image
बारामती ! न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती येथे माजी विद्यार्थी  स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न बारामती प्रतिनिधी - शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीर बारामतीतील न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती, लाटे या शाळेमध्ये सण २०००-२००१ या वर्षां शिकत असलेले माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. नुकतेच या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.     अनेक विद्यार्थी जवळजवळ २३ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक शाळेतील जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता   या स्नेह मेळाव्या प्रसंगी माजी विद्यार्थी एकत्र येत त्यांनी शाळेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंतचा येणारा खर्च यावेळी त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक गिरमे सर यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी कुलदीप चंद्रकांत ...