करंजेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणिडॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव-२०२३ निमित्त विविध कर्यक्रमाचे आयोजन

करंजेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव-२०२३ निमित्त विविध कर्यक्रमाचे आयोजन साईसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड आय.सी.यु. यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबीर संपन्न. सोमेश्वरनगर वार्ताहर(दि १३) - बारामती तालुक्यातील करंजे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बुधवार सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच सर्व रोग निदान शिबिर साईसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड आय.सी.यु. यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले यावेळी करंजे पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तर या शिबिर प्रसंगी हॉस्पिटलचे डॉ. विद्यानंद भिलारे ,डॉ. जयश्री भिलारे,डॉ. शुभम शाहा,डॉ. राहुल शिंगटे,डॉ. चैतन्य झेंडे,डॉ. काजल पवार सह हॉस्पिटल इतर कर्मचारी उपस्थित तर कार्यक्रम प्रसंगी बोलताना हॉस्पिटलचे डॉक्टर विद्यानंद भिलारे म्हणाले की करंजे परिसरातील गरजू व गोरगरीब लोकांसाठी संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत वात सर...