Posts

Showing posts from May, 2022
Image
निधन वार्ता ! शिवसेना आमदार रमेश लटके यांना श्रद्धांजली मुंबई, दि. 12 :- “मुंबईतील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. शिवसेना कार्यकर्त्यापासून मुंबई महापालिकेत नगरसेवक, विधानसभेत आमदारपर्यंतचा त्यांचा प्रवास ध्येयनिष्ठ, पक्षनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ लोकसेवकाचा प्रेरणादायी जीवनप्रवास आहे. संमिश्र लोकवस्तीच्या अंधेरी-पूर्व मतदारसंघातून सलग मिळवलेला विजय त्यांची लोकप्रियता, जनतेशी जूळलेली घट्ट नाळ दाखवणारा आहे. आमदार रमेश लटके यांचं निधन ही त्यांच्या मतदारसंघाची, महाविकास आघाडीची हानी आहे. दिवंगत रमेश लटके यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, पक्ष कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
Image
. .. त्या ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन बारामती :पिंपळी-लिमटेक गावातील होतकरू व सुशिक्षित बेरोजगार महिला व युवतींसाठी दहा टक्के महिला राखीव निधीतून मोफत २१ दिवशीय टेलरिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ मे २०२२ ते २९ मे २०२२ पर्यंत  गावातील महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी दिली.         सदर शिबिराचा शुभारंभ सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमेचे पुंजन करून आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रतिमेस सरपंच मंगल केसकर व उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील यांच्या हस्ते आदरांजली अर्पण करून करण्यात आला.          प्रस्ताविकात बोलताना या प्रशिक्षण शिबिराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षित महिला व युवतींना पंचायत समिती व जिल्हा परिषद मार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनेतून शिलाई मशीन मिळणे कामी प्रयत्न करणार तसेच हायटेक टेक्स्टाईल पार्क या ठिकाणी टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे माध्यमातून नोकरी किंवा घरगुती ...
Image
शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन पुणे दि.११-पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे ४ हजार ३०५ अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले  आहे. महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित असल्याने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यास विलंब होत असल्याने महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ निकाली काढण्याच्या सुचना समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टल माहे डिसेंबर २०२१ पासून सुरु करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत सन २०२१-२२ साठी ३९  हजार ८२६ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. अर्जाची छाननी करुन पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे यांच्या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्याने अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्व ...
Image
इंदापूर तालुक्यातील ही... वाडी होतेय रेशीम व्यवसायाची वाडी. इंदापूर- इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावातील शेतकरी तुतीची लागवड करून रेशीम व्यवसायाकडे वळत  आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि रेशिम संचालनालयातर्फे अल्पभूधारक शेकऱ्यांना अनुदान देण्यात येत असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरला आहे. साधारण २ हजार  लोकसंख्या असलेल्या या गावात मोजके शेतकरी २००६ पासून या क्षेत्राकडे वळले आहेत. त्यातील काहींनी पुन्हा पारंपरिक शेती सुरू केली. मात्र गेल्या दोन वर्षात रेशमाच्या कोशाला मिळणारा चांगला दर आणि इतर पिकांपेक्षा अधिकचे होणारे उत्पन्न यामुळे शेतकरी तुतीच्या लागवडीकडे वळले  आहेत. पाच वर्षापूर्वी केवळ ५ ते ६ शेतकरी तुतीची लागवड करीत होते. गेल्यावर्षी ही संख्या ३६ वर पोहोचली आणि ७३ नव्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. इंदापूर तालुक्यातील ३११ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली असून त्यापैकी ३६ एकर म्हसोबावाडीतील आहे. यात आणखी प्रति शेतकरी एक एकर याप्रमाणे ७३ एकरची भर पडणार आहे. शेतकरी रेशीम उद्योगासाठी लागणारे अंडीपूंज कर्नाटक अणि...
Image
इंदापूर ! इंदापूर तालुक्यासाठी दत्तामामा भरणे यांनी आणले 8 कोटी 57 लाख रुपये इंदापूर -  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणत विकास निधी खेचून आनत असून कोट्यावधींच्या विकास कामांचा त्यांनी तालुक्यात धडाकाच लावला आहे.भरणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 8 कोटी 57 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागरी सुविधाममधून 1कोटी 57 लाख, लेखाशीर्ष 3054 गट ब व क मधून दोन रस्त्यांकरिता 2 कोटी तर 2515 योजनेतून 5 कोटी रुपये असा एकूण निधी 8 कोटी 57 लाख रूपयांचा निधी इंदापूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. सणसर येथील समर्थ नगर थोरात घर रस्ता करणे ६  लक्ष, अंथुर्ण शिंदे मळा अंतर्गत रस्ता करणे १५ लक्ष,अंथुर्णे येथील ४८ फाटा ते दळवी वस्ती रस्ता करणे २० लक्ष,काटी येथील प्राथमिक शाळा ते महादेव मंदिर रस्ता करणे १० लक्ष,लासुर्णे येथील ग्रा.पं.लासुर्ण ते माळी मळा रस्ता करणे १० लक्ष,बिजवडी येथील काळेल वस्ती अंतर्गत रस्ता करणे १० लक्ष,बेलवाडी येथील कुंभारवस्ती रस्ता करणे ...
Image
बारामती तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची मासिक  बैठक  संपन्न                बारामती, दि. ११ : बारामती तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मासिक बैठकीचे  तहसिलदार विजय पाटील यांच्या उपस्थित प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजन करण्यात आले.                  बैठकीस  महसूल नायब तहसिलदार महादेव भोसले, शहर दक्षता समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड आणि  दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.                 बारामती तालुक्यात २२० स्वस्त धान्य दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी १८० स्वस्त धान्य दुकाने, तहसिल कार्यालय आणि शासकीय धान्य गोदाम यांना आय. एस. ओ. ९००१-२०१५ आणि आय. एस. ओ. २८०००-२००७ मानांकन प्राप्त झाले आहे. यावेळी आय. एस. ओ. मानांकन प्राप्त स्वस्त धान्य दुकानदारांना  तहसिलदार पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.                  यावेळी श्री. पाटील म्हणाले, ज्या स्वस्त धान्य दुकानाती...
Image
शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करा-कृषीमंत्री दादाजी भुसे    खरीप हंगामातील बियाणे उपलब्धता व पुरवठा;बीजोत्पादनाचा कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करा-कृषीमंत्री दादाजी भुसे    मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी,   योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. खरीप हंगाम 2022 मधील बियाणे उपलब्धता व पुरवठा, बीजोत्पादनाची आढावा बैठक कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषी आयुक्त धीरज कुमार, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक रूच...
Image
माळेगाव माधील विकासकामे चांगल्या दर्जाची करा- उपमुख्यमंत्री अजित पवार            बारामती  -   माळेगाव  नगरपंचायत  झाल्यानंतर या ठिकाणी विविध विकास कामे  सुरू  करण्यात आली असू    ती चांगल्या  दर्जाची  करावीत  ,  असे निर्देश  उपमुख्यमंत्री   अजित   पवार   यांनी  दिले.माळेगाव नगरपंचायत   कार्यक्षेत्रात   जि . प . निधीतून  मंजूर झालेल्या कचराकुंडी, भजनी मंडळास भजन साहित्य व १९ जि . प. शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप कार्य क्रमात  ते  बोलत होते.  यावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे  संचालक संभाजी होळकर  , बारामती   सहकारी बँकेचे  अध्यक्ष सचिन सातव,  प्रमोद बकाकडे, रोहिणी तावरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते, पुढे बोलताना पवार म्हणाले, माळेगाव येथे  बारामती तालुका क्रीडा  संकुल उभे राहत आहे पोलीस   कार्यालयाच्या   इमारतीचे  काम सुरू आहे. सर...
Image
भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शारदा बाळकृष्ण भापकर तर व्हाईस चेअरमन पदी अशोक निवृत्ती पवार यांची  निवड  मोरगाव :  तरडोली  ता. बारामती येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पंचवार्षीक निवडणूकीनंतर काल दि २ रोजी  चेअरमन  व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रकीया संपन्न झाली .या निवडीसाठी   शारदा बाळकृष्ण भापकर यांचा  चेअरमनसाठी तर व्हाइस चेअरमनसाठी अशोक निवृत्ती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने  निवड प्रकीया बिनविरोध पार पडली  झाली. तरडोली येथील भैरवनाथ सोसायटी निवडणुकीमध्ये भैरवनाथ परीवर्तन पॅनलने बाजी मारत  विरोधकांना नामोहरण करुन  सर्वच्या सर्व म्हणजे  १३ जागांवर विजय मिळवला होता . त्यानंतर काल दि २ रोजी   चेअरमन पदाच्या झालेल्या निवडीसाठी विनायक सोपाना गाडे, रमेश कांतीलाल गाडे , शारदा बाळकृष्ण भापकर , अशोक निवृत्ती पवार ,वसंत विठ्ठल भापकर , यशवंत शंकर भापकर, फुलचंद नानासो पवार, गौरी विनोद भोसले,प्रियांका सोमनाथ भापकर ,बेबी गफुरभाई तांबोळी,किसन हरीबा धायगुडे ,  रवींद्र गुलाब साळवे ,...