Posts

Showing posts from January, 2022

अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने दूध भेसळीस आळा घालण्यासाठी कारवाई सत्र सुरू

Image
अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने दूध भेसळीस आळा घालण्यासाठी कारवाई सत्र सुरू पुणे, दि.24 :-  जिल्ह्यातील दूध भेसळीस आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरू असून डिसेंबमध्ये ३०० किलोग्राम तर २१ जानेवारी २०२२ रोजी ७ लाख १२ हजार २६४ रुपये किमतीची व्हे-पावडर जप्त करण्यात आली आहे.  प्रशासनाने  ८ जुलै २०२१ रोजी नगर जिल्ह्यातून पुरवठा झालेल्या दुधाच्या टँकरवर बारामती येथे कारवाई करत २ लाख २९ हजार ४१७ रुपये किमतीचा ८ हजार ४९७ लीटर गायीच्यां दूधाचा साठा नष्ट केला होता. या नमुन्याचा अहवाल मानवी सेवनास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे २९ जुलै २०२१ रोजी दूध विक्रेता राजाराम खाडे यांच्या ताब्यात भेसळकारी पदार्थ व दुधाचा साठा आढळून आल्याने त्यांच्याकडून गाय दूध, व्हे पावडर व लिक्विड पॅराफिनचे नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  डिसेंबर २०२१ मध्ये इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील दूध संकलन केंद्रामध्ये भेसळकारी पदार्थ व्हे- पावडर आढळून आल्याने त्यांचेकडू

अष्टविनायक विकास आराखड्याबाबत पर्यटन मंत्र्यांनी घेतला आढावा

Image
अष्टविनायक विकास आराखड्याबाबत पर्यटन मंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : अष्टविनायक विकास आराखड्याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.             या बैठकीला पर्यटन विभागाच्या  सचिव वल्सा नायर-सिंह उपस्थित होत्या.             पर्यटन मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, नोडल एजन्सीमार्फत पर्यटनविषयक कामाला प्राधान्य देवून प्राथमिक स्वरुपातील जमीन, रस्ते, बसस्टॉप, वीज, पाण्याची टाकी, माहितीफलक, स्वागत कमानी, विद्युतीकरण या पायाभुत सुविधा पर्यटनस्थळी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. अष्टविनायक ट्रस्टला विश्वासात घेवून काम करावे. तसेच अष्टविनायक आराखडा निधीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.             राज्यमंत्री कु आदिती तटकरे म्हणाल्या,  अष्टविनायकसंदर्भातील दोन प्रस्ताव नियोजित आहेत. यापैकी मुलभूत सुविधा देण्यासंदर्भात 115 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दुसरा प्रस्ताव सुशोभिकरण, व्हीआयपी

जुन्या आठवणींना उजाळा देत... "सोमेश्वरविद्यालयात" माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.

Image
जुन्या आठवणींना उजाळा देत... "सोमेश्व र विद्यालयात" माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न. सोमेश्वर विद्यालयात सन 1999/2000(10 अ) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.. सोमेश्वरनगर    -  बारामतीतील    सोमेश्वरनगर मध्ये असणाऱ्या     सोमेश्वर   विद्यालय   सोमेश्वरनगर येथे तब्बल 20 वर्ष्यानी  सन - 1999/2000 (इयत्ता 10 अ) च्या    इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमे ळावा आनंदात संपन्न झालामेळाव्यास विविध जिल्हा तालुक्यातून   माजी   विद्यार्थी   विद्यार्थिनी  उपस्थित होत्या ते विद्यार्थी आत्ता  राजकीय,सामाजिक शिक्षण तसेच   डॉक्टर,   वकील   व्यावसाईक  अश्या विविध क्षेत्रात  आपला  ठसा उमठवत आहे  . विशेष म्हणजे हे   विद्यार्थी   एकत्र   येत त्यांनी  ज्या शाळेत आपण शिकलो   त्या   सोमेश्वर   विद्यालयास   त्या   नावाचा आकर्षक  फलक   कायमस्वरूपी   आठवण  राहावी म्हणून  भेटदिला यांचा आनंद त्या सर्वांच्याचेहऱ्यावर ओसंडत होता.निमंत्रित शिक्षकांना  त्यांना शाल पुष्प गुच्छ  श्रीफळ   देत   त्यांचा आशीर्वाद घेत जमलेल्या विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य बजावले, एक शाळेविषयी सुरुवात