Posts

Showing posts from August, 2021

भारतीय युवा पॅंथर बारामती तालुक्यातील पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ निंबुत येथे संपन्न.

Image
भारतीय युवा पॅंथर बारामती तालुक्यातील पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ निंबुत येथे संपन्न.     २५ ऑगस्ट २०२१ रोजी बारामती तालुक्या मधील निंबुत  या ठिकाणी प्रथम महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.  नव्याने उदयास आलेली भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या बारामती  तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम निंबुत येथील साहेब राव दादा विविध कार्यकारी सोसायटी निंबुत येथे मोठ्या आनंदात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी निंबुत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमर चंद्रशेखर काकडे होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून करंजेपुल पोलिस स्टेशनचे  पो नाईक अमोल भोसले सर व कॉन्स्टेबल साळुंखे सर , भारतीय युवा पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे संस्थापकीय सल्लागार अमित बगाडे नींबूत गावचे माजी सरपंच राजकुमार बनसोडे. विलास बनसोडे.  प्रसिद्धीप्रमुख अक्षय थोरात उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड. महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमिज   जादगर. रामदास  अशोक. बनसोडे ब...

बारामतीतील सदोबाचिवाडीत निकिता यादव या कृषिकन्या मार्फत विविध कृषिविषयक उपक्रम..

Image
बारामतीतील सदोबाचिवाडीत निकिता यादव या कृषिकन्या मार्फत विविध कृषिविषयक उपक्रम.. सोमेश्वरनगर प्रतिनिधी, बारामती तालुक्यातील सदोबाची वाडी गावांमध्ये निकिता यादव या विद्यार्थिनीने कृषीविषयक शेतकऱ्यांना माहिती देत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय फलटण येथे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी निकिता यादव हिने सदोबाचिवाडी तालुका बारामती येथील शेतकऱ्यांसाठी शेती विषयक विविध उपक्रम राबवले असून यामध्ये प्रामुख्याने बीजप्रक्रिया ,फळबाग लागवड, मधमाशा पालन ,पशुसंवर्धन तसेच शेती आधारित तंत्रज्ञान मोबाईल द्वारे कसे वापरावे याची माहिती देण्यात आली तसेच शेतीसंबंधी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिकांसह करून दाखवण्यात आली यावेळी सदोबाचिवाडी परिसरातील शेतकऱ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला याप्रसंगी प्राचार्य डॉ.सागर निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.व्ही. पी गायकवाड, प्रा. एन एस धालपे, प्रा. एस वाय लाळगे, प्रा. एस एस  नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची माहिती देण्यात आली.